आमच्या बद्दल
कोरपना या गावाला निजामकालीन ऐतिहासिक पाश्वभुमि आहे. कोरपना हे गांव महाराष्ट्र तेलंगना सिमेवर राजुरा-आदिलाबाद हायवेवर वसलेले आहे. हे गांव स्वतःत्र्य पूर्व काळात हैद्राबाद स्टेटला विलीन होते भारताला १५ ऑगष्ट १९४७ साली स्वतंत्र मिळाले तेव्हाही या गावावर निजामाचे राज्य होते. त्या वेळेसचे संरक्षणमंत्री वल्लभभाई पटेल यांनी हैद्राबाद स्टेट मधुन निजामांना हकलण्याकरीता लष्कर बोलावुन १७ सप्टेंबर १९४८ ला निजामाला पराभुत करून हे गांव स्वातंत्र्य भारतात विलिन झाले. या गावाचा जिल्हा प्रथम निजाम स्टेट असल्यामुळे आदिलाबाद होता १७ सप्टेंबर १९४७ नंतर या गावाला नांदेड जिल्हा मराठवाडा येथे जोडण्यात आले. त्या नंतर १ मे १९६० ला स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्टाचे पहिले मुख्यमंत्री श्री.मा.सा. कन्नमवार यांनी वर्धा नदीवर पुलबांधकामास मंजुरी देवुन तेथील पुल बांधल्यानंतर नदी अलिकडील जुना राजुरा तालुका हा चंद्रपूर जिल्हयाला जोडण्यात आला या भागाचा सन १९८०- ८५ पर्यंत कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही त्या वेळेसचे असलेले महाराष्ट्र शासनाने ब्लॉक तिथे नविन तहसिल निर्माण करण्याचा फतवा काढला व त्या वेळेस जुना राजुरा तालुका असल्यामुळे ब्लॉक देवाडा होते जुना राजुरा तालुका पुर्व पश्चिम लांबी अंदाजे ६५ कि.मी. असल्यामुळे देवाडा तहसिल झाली तर आंध्रसिमेवर असणाऱ्या लोकांना काहीच फायदा होणार नाही. या करीता स्व. हरबा पा. राजुरकर रा. कोडशी बु. यांनी हि बाब तेव्हाचे आमदार श्री. प्रभाकरराव मामुलकर यांचे लक्षात आणून दिली व देवाडा ब्लॉक येथे तहसिलचे ठिकाण रद्द करून नविन कोरपना तालुका झाला पाहिजे या करीता परिसरातील जनतेला घेवुन अनेक आंदोलन चक्का जाम, उपोषण, मंत्री महोदयास निवेदन, करून तद्नंतर राजुरा कोरपना या तालुक्याचा महसुली नकाशा तयार करून जुना राजुरा तालुका पुर्व पश्चिम विस्तारलेला असल्या मुळे एका तालुक्याचे दोन तालुके करण्याच्या दृष्टीने उत्तर दक्षिण भाग पाडुन नविन कोरपना तालुका १५ ऑगष्ट १९९२ ला अस्तित्वात आला कोरपना या गावात आजची लोकसंख्या अंदाजे ७५०० ते ८००० असुन येथे तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पोलीस स्टेशन, औ.प्र. संस्था, विज वितरण केंद्र, ग्रामिण रुग्णालय, कॉन्वेट पासुन कॉलेज पर्यंत उच्च शिक्षण घेण्याची सोय आज कोरपना येथे आहे. कोरपना हनुमान मंदिर, शारदा मंदिर, दुर्गा मंदिर, राम मंदिर व मस्जिद व पंचशिल भवन या सारखे धार्मीक प्रेक्षणीय स्थळे आहे. आज कोरपना येथे तहसिल कार्यालया बरोबर गावाला नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यामुळे शासन व प्रशासन यांचे सहकार्याने विकासाकडे वाटचाल करीत आहे.. नगर पंचायत कोरपना ची स्थापना दिनांक १७ जून २०१५ रोजी झाली.